सन 1898 साली स्थापन झालेल्या शहर सुधार प्रन्यासाव्दा‍रे (City Improvement Trust) मुंबई शहरातील कामगार वर्गाच्या व गरीब कामगारांच्या निवास व्यवस्थेच्या समस्या सुधारण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येत होते, दरम्यान सन 1914 ते 1918 या कालावधीत झालेल्या महायुध्दानंतर मुंबई शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढण्या सुरुवात झाल्याने कामगार वर्गातील व कमी उत्पन्न असलेल्या गटातील कर्मचा-यांची निवासस्थानांची व्यवस्था सुधारण्याचा प्रश्‍न शासनाच्या समोर उद्भभवला. सन 1919 मध्येच मुंबई शहरात जवळ जवळ 8,93,000 कामगार वर्ग एक खोली निवासात रहात असून निवासस्थानाच्या उपलब्ध्तेतील घट तथा तुटवडा भरुन काढण्यासाठी पुन्हा 64,000 एक खोली निवासस्थाने बांधण्याची गरज असल्याची वस्तुस्थिती तत्कालीन महापालिका आयुक्‍तांनी सादर केलेल्या आकडेवारी वरुन निदर्शनास आली. तशातच सुत गिरणी कामगार, कारागीर व सर्वसाधारण कामगार यांना मुंबई शहरातच रहाण्याची सक्ती करण्यांत आली होती.  अधि‍क माहि‍ती...
 
 

एक महत्‍वकांक्षी प्रकल्‍प, मुंबई वि‍कास वि‍भाग चाळीची आधुनि‍की करणाकडे वाटचाल, वैशि‍ष्‍टयपूर्ण संगणकीय प्रणाली तयार करून संगणकीकरणाच्‍या स‍हाय्याने गाळयांचे भाडेदारी हस्‍तांतरण, भाडे गोळा करणे, करारपत्रांचे जतन व मुंबई वि‍कास वि‍भाग चाळीचे भाडेकरू , दुकाने इत्‍यादी वि‍स्‍तृत महत्‍वपूर्ण माहि‍ती, संगणकावर उपलब्‍ध ज्‍यामुळे माहि‍ती कायदयाची आवश्‍यक पूर्तता माहि‍ती घेणा-यासाठी योग्‍यप्रकारे होऊ शकेल.

 
 
 
   व्‍यवस्‍थापक,

   मुंबई वि‍कास वि‍भाग चाळी,

   चाळ क्रमांक 51, तळमजला, जाभोरी मैदानासमोर,
   डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी मुंबई -18.
   दूरध्‍वनी : 022-24932698
 

कॉपीराईट © 2010 महाराष्ट्र सा.बां.वि. सर्व अधिकार आरक्षित

site powered by Renercon Interweb Pvt Ltd. (9223902680)